Skip to main content

मोबाईलची बॅटरी अधिक काळ टिकवण्यासाठी करा हे सोपे उपाय.

Welcome to technical Vishal ...

                              फोनची बॅटरी                             लवकर संपतेय?                        ‘हे’ उपाय करून पाहा


स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वापर जास्त झाल्यामुळे स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते. अशावेळी मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर काहींचा स्मार्टफोन लवकर चार्ज होत नाही. स्मार्टफोन चार्ज होण्यासाठी जास्त वेळ लागत असेल तर मी  तुम्हाला काही गोष्टी सांगाणर आहे. ज्यामध्ये स्मार्टफोन लवकर चार्ज न होण्याचं कारण असू शकते….

खराब अॅडेप्टर किंवा केबल –

 खराब चार्जर असू शकतो. त्यामुळे स्मार्टमान खराब झाला असं ग्रहित धरण्यापेक्षा अडेप्टर किंवा चार्जर बदलून पाहावा. शक्यतो स्मार्टफोनसोबत आलेल्या चार्चरनेच मोबाइल चार्ज करावा. जर मोबाइलसोबत आलेला चार्जर खराब झाला असेल तर ओरिजनल चार्जर विकत घ्यावा.
पावर सोर्स –
स्लो चार्जिंगसाठी प्रत्येकवेळा चार्जर केबल किंवा अॅडेप्टरला दोषी धरू शकत नाही. असेही असू शकते की तुम्ही चार्जिंगसाठी कुमकुवत पॉवर सोर्सचा वापर करत असाल. किंवा तुम्ही वायरलेस चार्जरचा वापर करत असाल तर तुम्हाला वायरवाला चार्जर वापरायची गरज आहे. सॅमसंगसारख्या कंपनीचा वेगवान वायरलेस चार्जरसुद्धा रेग्यूलर चार्जरपेक्षा संथ गतीने मोबाइल चार्ज होतो.

रनिंग अॅप क्लिअर करा –

बॅग्राऊंडला अॅप्लिकेशन सुरू राहिल्यास मोबाईलच्या मेमरीवरही जास्त भार येतो आणि बॅटरीही वापरली जाते. मोबाइल चार्ज संथ गतीने होण्यास हेही एक कारण असू शकते. मोबाइलमध्ये कायम आपलं काम झाल्यानंतर रनिंग अॅप्लिकेशन क्लिअर करावं.

खराब यूएसबी पोर्ट –
सर्व करूनही तुमचा फोन संथ गतीने चार्ज होत असेल तर तुमचा यूएसबी पोर्ट खराब झालेला असू शकतो. स्मार्टफोनच्या आधिककाळ वापर केल्यानंतर यूएसबी पोर्टमध्ये धूळ गेलेली असू शकते. किंवा खराब झालेलं असू शकते. एकदा यूएसबी पोर्ट साफ करून घ्या. किंवा स्मार्टफोनच्या गॅलरीमध्ये दाखवून यूएसबी पोर्ट खराब झालं असेल तर रिप्लेस करा.

खराब बॅटरी –
मोबाईलमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे बॅटरी. बॅटरी संपली की मोबाईवर काहीच करता येत नाही. सध्याच्या नव्या मोबाईलमध्ये आता लीथीयम आयन बॅटरीचा वापर केल्यानं आधीच्या तुलनेत ती जास्त टिकून राहण्यास मदत होते. मात्र काही गोष्टींची काळजी घेतली तर त्यांचं लाईफ आणखी वाढून उत्तम परफॉर्मेंस देऊ शकते.

मोबाईल किंवा बॅटरी जास्त गरम होऊ देऊ नका –

तुमचा स्मार्टफोन अशा ठिकाणी ठेवा जिथे तापमान कमी असेल. अतितापमानाचा बॅटरीवर परिणाम होतो. तुमचा फोन टीव्ही किंवा फ्रीजवर ठेवू नका ज्यामुळे त्याच्या बॅटरीवरही परिणाम होतो. उन्हामध्ये फोन गरम होतो अशावेळी बाहेर असाल आणि फोन जास्त गरम झाला असेल तर फोन काहीवेळ आवश्यकता नसल्यास बंद ठेवा त्यामुळे बॅटरी नॉर्मवर येण्यास मदत होते.


मोबाईलची बॅटरी अधिक काळ टिकवण्यासाठी करा हे सोपे उपाय

.फोन चार्जिंग करताना घ्‍यावयाची काळजी :

1)फास्ट चार्जरने चार्ज होणाऱ्या चार्जरचा वापर टाळा.

2)कमी वेळात चार्ज होणाऱ्या चार्जरचा वापर शक्यतो टाळा. अशा चार्जरचा नियमित वापर केल्याने बॅटरी निकामी होण्याची शक्यता असते.

3)फोन रात्रभर चार्जिंगला लावू नका.
काही मोबाईल फोनमध्ये बॅटरी सेव्हर असा पर्याय असला तरी, फोन रात्रभर चार्ज केल्याने फोन लवकर गरम होतो. बॅटरीही खराब होते. कोणताही मोबाईल फोन चार्जिंग होण्यासाठी २ तास वेळ पुरेसा ठरतो.

4)१०० टक्के चार्जिंग करु नका.
कधीही फोन ८० टक्क्यांपेक्षा जास्त चार्जिंग करु नका. कारण यामुळे बॅटरी गरम होऊ शकते. त्यामुळे बॅटरीचे आयुष्य कमी होऊ शकते.








Comments

Popular posts from this blog

18 वर्षे आणि वरील नागरिकांनी लस साठी कशी नोंद करावी.

  18 वर्षे आणि वरील नागरिकांनी लस साठी कशी नोंद करावी ----- Age group 18 Yrs and above can be  Regisred Online from Date 28/04/2021 for covid vaccine. पहिल्या किंवा दुसरा covid vaccine डोस साठी Register करा👇 Login site is www.cowin.gov.in Google वर जाऊन cowin.gov.in टाईप करा. Register/ Sign in yourself मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.  OTP रजिसटर फोन नंबर वर येईल तो  तेथे टाका व क्लिक करा. Vaccine Registraction form भरा.क्लिक करा तुम्ही vaccine साठी registraction केलेल्या  नंबर वरती मेसेज येईल. schedule appointment वर क्लिक करा. नंतर पिन कोड टाका (उदा.422601) Sesstion निवडा-  सकाळचे किंवा दुपारचे. Vaccin center व Date निवडा. Appointment book करुन ती coform करा. Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल. त्यामुळे vaccination center वर  vaccine देणे सोपे होईल. कृपया हि पोस्ट आपल्या सर्व ग्रुप्स वर पाठवा.

Whatsapp आता गुलाबी रंगाचे होणार या व्हायरल मेसेजला क्लिक करू नका, नाहीतर होतील हे तोटे....

 सोशल मीडियावर रोज काही ना काही मेसेज व्हायरल होत असतात. आता व्हॉट्सअॅप संबंधी एक मेसेज व्हायरल झाला आहे. व्हॉट्सअॅप हे हिरव्या रंगाचे आहे. पण ते आता गुलाबी रंगाचे होणार आहे, असा दावा केला जात आहे. पण मागे वेगळेच कारण आहे. सध्या व्हॉट्सअॅपवर एक मेसेज खूप व्हायरल होत आहे. यात म्हटले की Whats app आता हिरव्या रंगात नाही तर पिंक म्हणजेच गुलाबी रंगात बदलण्यात येणार आहे. हा दावा करतानाच एक लिंक सुद्धा दिली आहे. सायबर तज्ज्ञांनी या मेसेजमध्ये दिलेल्या लिंकला क्लिक न करण्याचा सल्ला दिला आहे. जर तुम्ही या लिंकला क्लिक केले तर तुमचा फोन हॅक होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. व्हायरल मेसेज मध्ये दावा करण्यात येत आहे की, या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचे व्हॉट्सअॅप गुलाबी रंगाचे होईल. तसेच त्यात नवीन फीचर्स सुद्धा जोडले जातील. याला व्हॉट्सअॅपचे अधिकृत अपडेट सांगितले जात आहे. सायबर सुरक्षा तज्ज्ञ राजशेखर राजहरिया यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, व्हॉट्सअॅप पिंक (Whatsapp Pink) संबंधी कोणतीही लिंक आल्यास तुम्ही सावध राहा. एपीके डाउनलोड लिंक सोबत व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये व्हायरस पसरवण्याचा प्रयत्...